जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सिंधी कॉलनी परिसरात बांधकामाच्या ठिकाणी ईलेक्ट्रीकचे काम करत असतांना विजेचा जोरदार धक्का लागल्याने हरीविठ्ठल नगरातील २४ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
अक्षय प्रल्हाद साठे (वय-२४) रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, “अक्षय साठे याने सिंधी कॉलनी परिसरात बांधकामाच्या ठिकाणी ईलेक्ट्रीक करण्याचे काम घेतले होते. दरम्यान, आज गुरूवार, दि. ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास काम करत असतांना त्याला विजेचा जोरदार धक्का लागला. त्यात तो खाली फेकला गेला. त्याच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.
यासंदर्भात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. प्राथमिक तपास पोहेकॉ मनोज पवार करीत आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ आणि एक बहिण असा परिवार आहे.