Home Cities अमळनेर लिओ क्लबतर्फे मोफत दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन

लिओ क्लबतर्फे मोफत दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन

0
107

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील लिओ क्लबतर्फे ४ सप्टेंबर रोजी भगिनी मंडळ शाळेसमोरील डॉ. शुभम झाबक यांच्या अंतरिक्ष डेंटल क्लिनिकमध्ये मोफत दंत तपासणी, मार्गदर्शन आणि सवलतीच्या दरात उपचार केले जाणार असून या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

त्यासाठी बस स्टँड जवळील मानसी मेडिकल, सुभाष चौकातील रोशन मेडिकल ,स्टेशन रोडवरील जेपी झेरॉक्स व साने गुरुजी शाळेसमोरील अरिहंत मेडिकल येथे नाव नोंदणी करावी असे आवाहन क्लबचे अध्यक्ष हरिओम अग्रवाल, सेक्रेटरी मिहीर पवार, ट्रेझरर कुशल गोलेछा, प्रोजेक्ट चेअरमन प्रणित झाबक व हर्षल नावरकर, लीओ चेअरमन डॉ. मिलिंद नवसारीकर, लिओ को – चेअरमन प्रशांत सिंघवी यांनी केले आहे.


Protected Content

Play sound