पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे श्रीमंत छत्रपती संभाजी राजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेची पहिली बैठक नवनाथ मंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
ही बैठक स्वराज्याचे प्रवक्ते करण गायकर व धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शना खाली व स्वराज्याचे जळगाव जिल्हा निमंत्रक सुनील देवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून विनोद पाटील, पी.जी.पाटील हे उपस्थित होते. यावेळी स्वराज्याचे जिल्हा निमंत्रक सुनील देवरे यांनी उपस्थित स्वराज्याच्या शिलेदारांना स्वराज्य संघटने विषयी माहिती दिली. स्वराज्य संघटनेचे ध्येयधोरण समजून सांगितले श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये स्वराज्य या संघटनेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरायला सुरुवात झाली असून त्यामध्ये पारोळा तालुक्यातील युवकांचा मोठा सहभाग दिसून येत आहे.
स्वराज्य संघटना हि सर्वसामान्य बहुजनांची आहे. सर्वसामान्याला संधी देऊन त्याला आपले कार्य सिध्द करण्यासाठी छत्रपतींचे हे स्वराज्य आहे. म्हणून गाव तेथे स्वराज्य संघटना असली पाहिजे त्या दृष्टिकोनाने काम करावे. तसेच संघटनेच्या माध्यमातून गोरगरिबांचे कामे पूर्ण करावेत, यासाठी प्रयत्न करा व शिलेदारांनी स्वराज्याची पुढील बैठकीपर्यंत संघटना वाढीसाठीचे काम पाहून योग्य ती जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे श्री देवरे यांनी सांगितले.
यावेळी अनिल पाटील, रविंद्र पाटील, योगेश पाटील, राहुल पाटील, अरुण जगताप, गिरीश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने स्वराज्याचे शिलेदार उपस्थित होते.