धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पष्टाने येथील शेत शिवारातील विद्यूत खंब्यावरील तार अज्ञात चोरट्यांनी कट करून चोरून नेल्याची घटना घडली होती. संबंधित शेतकऱ्याने शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाब वाघ यांना माहिती दिली. त्यानुसार वाघ यांनी महाविरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलून समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पष्टाने येथे शेतकऱ्याच्या शेतातील विद्यूत खंब्यावरील विद्यतू तार साधारण एक किलोमीटर अंतरापर्यंत विजेचे तार तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. त्यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. गुलाबराव वाघ यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ही बाब सांगितल्यानंतर दोन-तीन दिवसात लवकरात लवकर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावे, असे आश्वासन महावितरणचे अधिकारी पवार यांनी दिले. यावेळी सहसंपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ, मा.लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, दीपक सोनावणे, सरपंच किशोर पाटील, अमोल पाटील, ग्रामसेवक मुरलीधर अण्णा व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.