यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दोन महत्वाच्या राज्यांना जोडणाऱ्या बु्ऱ्हाणपुर अंकलेश्वर या राज्यमार्गा वरील यावल ते किनगाव रस्त्याची खड्डयामुळे अत्यंत बिकट अवस्था झाली असून त्याची दुरुस्ती करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांनी केली आहे.
या संदर्भात दिलेल्या तक्रार निवेदनातरवींद्र सुर्यभान पाटील यांनी म्हटले आहे की , गुजरात आणि मध्य प्रदेश अशा दोन महत्वाच्या राज्यांना जोडणारा बुरहानपुर ते अंकलेश्वर या राज्य मार्गावरील यावल ते किनगाव रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. यामार्गावर मोठ मोठे खड्डे पडलेले असल्यामुळे वारंवार अपघात होवून निरपराधांना आपला जीव गमवावा लागत आहे. आठ दिवसामध्ये या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आमरण उपोषण करू असा इशारा रवींद्र सूर्यभान पाटील यांनी दिला आहे.