Home राजकीय शिवसेना पदाधिकार्‍याने शहाजीबापूंची क्वॉर्टर आणि मटणच काढले !

शिवसेना पदाधिकार्‍याने शहाजीबापूंची क्वॉर्टर आणि मटणच काढले !

0
40

सोलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | डोंगार. . . झाडी डायलॉगमुळे फेमस झालेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर शिवसेनेच्या पदाधिकार्‍याने सडकून टीका केली आहे.

 

एकनाथ शिंदे यांच्या गटातील सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना उदंड प्रसिध्दी लाभली आहे. त्यांचा काय ते हॉटेल. . .हा डायलॉग तर खूपच फेमस झालेला आहे. आता त्यांना अनेक वाहिन्यांवर बोलावले जाते. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांना तोच तो डायलॉग देखील म्हणायला लावण्यात येतो. मात्र आता शहाजी पाटील यांच्यावर शिवसेनेच्या पदाधिकार्‍याने अगदी शेलक्या भाषेत टीका केली आहे.

 

माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव म्हणाले की, दररोज संध्याकाळी या आमदाराला दोन क्वार्टर दारु लागते आणि चार किलो मटण लागतं. शहाजीबापू पाटील यांच्यामुळे त्यांच्या भावावर गळफास लावून आत्महत्या करण्याची वेळ आली, असा गंभीर आरोपही अभंगराव यांनी केला आहे. हा माणूस आमदारकीसाठी उध्दव ठाकरे पाय चाटत असतांना आता त्यांच्यावर टीका करत असल्याचेही ते म्हणाले. आपण त्यांना आमदारकी लढविण्यासाठी २० लाख रूपये दिले असतांना त्यांनी ते आजवर परत केले नाहीत. तर शहाजीबापू यांच्यामुळे त्यांच्या भावावर आत्महत्येची वेळ आल्याचा गंभीर आरोप देखील अभंग यांनी याप्रसंगी केला.


Protected Content

Play sound