जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील आसोदा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी आज ना. गुलाबराव पाटील यांची सदिच्छा भेऊन घेऊन त्यांचा सत्कार करत आगामी वाटचालीसाठी पाठींबा व्यक्त केला.
ना. गुलाबराव पाटील यांनी अलीकडेच लागोपाठ तिसर्यांदा मंत्रीपदाची तर दुसर्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रीपदाचा शपथविधी घेतल्यानंतर त्यांचे मतदारसंघात जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर विविध समाजमंडळे, संघटना, संस्था आदी भेटून त्यांना पाठींबा व्यक्त करत आहेत. या अनुषंगाने आज आसोदा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकार्यांनी ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेतली.
ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकार्यांनी ना. गुलाबराव पाटील यांचा शाल श्रीफळ आणि पुस्तक देऊन सत्कार करत त्यांच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ना. पाटील यांचे आजवर आपल्याला सहकार्य लाभले असून भविष्यातही लाभणार असल्याचे याप्रसंगी नमूद करण्यात आले. तर ना. गुलाबभाऊंनी आगामी काळातील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या. याप्रसंगी डी.यु भोळे सर, चिंधु महाजन, दिलीप सावदेकर, अनिल महाजन, प्रफुल्ल सावदेकर, रमेश गुरुजी, जगन्नाथ चौधरी, तुकाराम चौधरी, नरेंद्र भंगाळे, कृष्णा पाटील .कौतिक बर्हाटे, गोविंदा महाजन, श्री. नारखेडे, तुषार महाजन, संजय माळी आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, या सत्काराला उत्तर देतांना ना. गुलाबराव पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचे आभार मानत ज्येष्ठांच्या विविध मागण्यांना शासन दरबारी मांडण्याची ग्वाही दिली.