जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जागतिक बँक अर्थसहाय्य तथा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत समुदाय आधारीत संस्थांकडून मूल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत असल्याचे प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष ठाकूर यांनी कळविले आहे.
अर्ज हे शेतमाल, शेळया ( मास व दुध) आणि परसबागेतील कुक्कूलपालन (अंडी) यांच्या मूल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पांसाठी आहेत. अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारीत संस्थांमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापिक प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाव्दारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्रे यांचा समावेश आहे.
या संदर्भातील माहिती, अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना इ. माहिती http://www.smart-mh.org या संकेतस्थळावर Call for Proposal या टॅबमध्ये उपलब्ध आहे. यापूर्वी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अर्ज सादर केलेला असल्यास पुनश्च: अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. इच्छुकांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट घ्यावी. त्यामध्ये माहिती भरुन व आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून शेतमाल आधारीत मूल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प शेतकरी उत्पादक कंपन्यांनी प्रकल्प संचालक, आत्मा, प्लॉट नं. 10, पुष्कराज बिल्डींग दिक्षीतवाडी, जळगाव कार्यालयात, तसेच इतर उपप्रकल्प संबंधित लोकसंचलित साधन केंद्रांनी जिल्हा समन्वयक अधिकारी, माविम आणि प्रभाग संघांनी जिल्हा अभियान व्यवस्थापक, एमएसआरएलएम यांचे कार्यालयात ऑफलाईन अर्ज 31 ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी 5.00 पर्यंत नवीन अर्ज सादर करावेत, असेही आवाहन ठाकूर यांनी कळवले आहे.