स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्याच्या ७५ वा अमृत महोत्सवानिमित्त मुक्ताईनगर शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.

 

“हर घर तिरंगा, वंदे मातरम, भारत माता की जय”, घोषणा देत मोटरसायकल रॅलीसह पायी रॅली काढण्यात आली. रॅलीला पोलीस निरीक्षक शेळके यांनी झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात  झाली. रॅलीमध्ये सहभागी पोलीस निरीक्षक शेळके, पीएसआय शेवाळे, पीएसआय बोरकर,  महिला पोलीस पीएसआय तडवी,  नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड, गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल, होमगार्डचे समादेशक अधिकारी विकास जुमळे, सार्जंट देवेंद्र काटे, पुरुष व महिला पोलिस होमगार्ड व महिला होमगार्ड पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस विविध बचत गटातील महिलांनी सहभाग घेतला.

 

मुक्ताईनगर एनसीसीचे छात्र व मुक्ताईनगर मधील स्वयंसेवी संस्था व सिव्हिल सोसायटीचे पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित व्यक्ती यांनी सहभाग घेतला. रॅलीमध्ये ७५ फूट लांबीचा तिरंगा घेऊन रॅली पंचायत समिती, नगरपंचायत  कार्यालय, प्रवर्तन चौक, जुने गाव , बोदवड चौफुल्ली मार्गे काढत त्यांची सांगता पोलीस स्टेशन येथे करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपनीय पोलीस हवालदार गणेश मनुरे , मंगल पारधी, होमगार्ड राजु घुले ,भुषण खडसे , सुनील तायडे व होमगा देवेंद्र काटे यांनी परीश्रम घेतले.

Protected Content