Home धर्म-समाज सातगाव (डोंगरी) आश्रम शाळेत रक्षाबंधन उत्साहात साजरी

सातगाव (डोंगरी) आश्रम शाळेत रक्षाबंधन उत्साहात साजरी

0
40


पाचोरा  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  तालुक्यातील  सातगाव (डोंगरी) येथील पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालय व आदर्श आश्रम शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

रक्षाबंधन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनीता सुभाष पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील दत्तू पाटील, गजानन लाधे पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांना बहिणीची व भावाची आठवण येऊ नये यासाठी सदर विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तमराव मनगटे पाटील, राहुल, अधीक्षिका शुभांगी पाटील यांनी कार्यक्रम आयोजित करुन, “बहिण भावाचं पवित्र नातं” याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  यावेळी शिक्षक डी. आर. पाटील, सुनील बच्छे, फिरोज खाटीक, संदेश पवार, सागर पाटील, शुभांगी पाटील, ओमप्रकाश शेंडे, कमरुद्धीन तडवी, सखाराम चव्हाण, सखुबाई तडवी, सदाबाई तडवी, माधुरी अलाट आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound