जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात आज, बुधवारी १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता महिला उत्थान मंडळाच्या वतीने रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जळगाव शहर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
जळगाव शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांच्यासह शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. महिला उत्थान मंडळाच्या वतीने असलेल्या महिला सदस्यांनी यावेळी भाऊ आणि बहिणीचे प्रेमासंदर्भात उदाहरणासह स्पष्टीकरण दिले. यावेळी महिला सदस्यांनी वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचारी बांधवांना हातात राखी बांधण्यात आले.
याप्रसंगी अल्पा चौधरी, कोमल सोनवणे, कविता चौधरी, वैष्णवी पतंगे, ॲड. मनीषा म्हस्के, पूजा पाटील, संगीता दुसाने, कुंतल वाघमारे, ज्योती पतंगे, सुनिता पाटील, निकिता पाटील, कोमल सूर्यवंशी यांच्यासह आदी महिला मंडळाच्या सदस्य उपस्थित होत्या.