Home क्राईम जळगावातून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगावातून तरूणाची दुचाकी लांबविली

0
33
bike thieves 20180259850
bike thieves 20180259850

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रेल्वेस्थानकाच्या बाजूला असलेल्या शिवाजीनगर भागात एका तरुणाची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश दिलीप खर्चाने (वय-३०) रा. हरिओम नगर, जुना आसोदा रोड, जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. इलेक्ट्रिकशीअनेचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवार ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता तो शिवाजीनगर भागाकडील रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या एका वॉल कंपाऊंडजवळ दुचाकी (एमएच १५ एएफ ७६८१) ने आला होता. त्यावेळी त्याने कंपाऊंडच्या शेजारी असलेल्या दत्त मंदिराजवळ दुचाकी पार्किंगला लावून कामानिमित्त निघून गेला. त्यानंतर काम आटोपून घरी परत आला असता त्याला जागेवर दुचाकी मिळून आली नाही. दुचाकीचा सर्वत्र शोधाशोध केली असता दुचाकी मिळून आली नाही. अखेर त्याने दुपारी १ वाजता जळगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक योगेश पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound