जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महापालिकेच्या सभागृहात सोमवारी ८ ऑगस्ट रोजी महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले.
शासन निर्देशानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमांसह अन्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अश्या सुचना देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जळगाव शहर महापालिकेच्या सभागृहात महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी सांगितले की, शासनाच्या निर्देशानुसार जळगाव महापालिकेच्या माध्यमातून जळगाव शहरातील १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान शासकीय, निमशासकीय व खासगी संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. महापालिकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केले आहे.
शिवाय जळगावातील बचत गटाच्या माध्यमातून तिरंगा ध्वजाची निर्मीती करण्यात आले आहे. तर ५० हजार ध्वज निर्मीती करण्यात अनेकांना रोजगार देण्यात आले आहे. शहरात १३ ठिकाणी हे तिरंजा ध्वजाची विक्री करण्यासाठी स्टॉल लावण्यात आले आहे. शहरातील सर्व नागरीकांनी या कार्यक्रमात सहभाग घेवून स्वातंत्र्य दिन आनंदाने साजरा करण्यात यावा असे आवाहन उपायुक्त शाम गोसावी यांनी केले.
या कार्यक्रमाला महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ विद्या गायकवाड, उपायुक्त श्याम गोसावी यांच्यासह महापालिकेचे नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1982274661963825