चटकदार कोकम सरबत (व्हिडीओ)

kokam sharabat

जळगाव (प्रतिनिधी) आज आपण कोकम सरबत कसे बनवायचे, ते शिकणार आहोत. कोकम सरबत हे आंबट-गोड चवीचे, अतिशय चटकदार, पाचक, आम्लपित्तनाशक असे गुणकारी पेय आहे.

मे महिन्यात, गावाला गेले असताना आंब्याबरोबरच, कोकमाची झाडे ही लाल, लिंबूच्या आकारात फळांनी बहरलेली दिसतात. कोकणात ह्या फळांना ‘रातांबा’ असे म्हणतात. कोकम सरबत हे उष्णतेच्या विकारांवर अत्यंत गुणकारी असते. कोकमाचा गोड अर्क हा वर्षभर बाहेर चांगला टीकतो. ह्यात हवे तेव्हा पाणी मिसळून सरबत बनवता येते. सरबत कसे बनविले जाते, याबदद्ल आपल्याला माहिती देणार आहेत, शेफ हर्षाली चौधरी व प्रतिमा पाटील.

 

कोकम सरबतासाठी लागणारे साहित्य:- कोकम, जिर, काळेमीठ, शुगर सिरप, बर्फाचे तुकडे.

कृती:- कोकमाची फळे चांगली पिकली की, झाडावरून काढावी. त्याची देठ काढून, त्यांना मधोमध चीर द्यावी. आतमध्ये पांढऱ्या बियांचा भाग असेल, तो काढून टाकावा. फक्त बाहेरचे लाल आवरण (साली) एका पातेल्यात गोळा करावे. ह्या साली झाकल्या जातील एवढी साखर घालून पातेले झाकून ठेवावे. दुसया दिवशी लाल रस सुटलेला दिसेल. हा रस बरणीत ओतून घ्यावा आणि परत सालींवर साखर टाकून पातेले झाकून ठेवावे. ही कृती कमीतकमी चार ते जास्तीत जास्त सात दिवस करावी. हा जमा झालेला गोड अर्क सरबत करण्यासाठी वापरावा. अन्य पाककृतीचा आस्वाद घेण्यासाठी ‘लाइव्ह ट्रेंडस् न्यूज’ला नियमित भेट दया.

 

Add Comment

Protected Content