Home क्राईम घरफोडी प्रकरणातील आरोपीस पोलीस कोठडी

घरफोडी प्रकरणातील आरोपीस पोलीस कोठडी


जळगाव प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनीतील एका घरातून मोबाईल व सोन्याचे दागीन्यांची चोरी केल्याप्रकरणी संशयीत आरोपीला शनिवारी दुपारी अटक केली होती. आज आरोपीतास न्यायालयात हजर केले असता त्याला 22 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयुर संजय पाटील वय-22, रा. हरीष नगर, रामेश्वर कॉलनी, अदित्य हॉटेल जवळ 11 मे रोजी रात्री घरात झोपलेले असतांना संशयित चोरटा शाईदास भगवान राठोड वय 19 रा. मंगलपूरी बाजुला मंगलपुरी, रामेश्वर कॉलनी याने घरात घुसून तीन हजार रूपये किंमतीचा मोबाईल आणि 67 हजार रूपये किंमतीचे तीन तोळ्याचे मंगळसुत्र असे एकुन 70 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला होता. याबाबत एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयडीसी पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपी भाईदास राठोड याला 18 मे रोजी अटक करण्यात आली. न्या. ए.एस. शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला 22 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound