Home Cities मुक्ताईनगर घरकुलांबाबत खा. रक्षा खडसे यांची सचिवांसोबत चर्चा !

घरकुलांबाबत खा. रक्षा खडसे यांची सचिवांसोबत चर्चा !

0
33

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मतदारसंघातील पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत मंजूर घरकुलांबाबत आज खासदार रक्षाताई खडइे यांनी या योजनेचे सचिव मनोज जोशी यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले.

रावेर लोकसभा मतदार संघातील नगरपालिका क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास (शहरी) योजना अंतर्गत प्रस्तावित व मंजूर असलेल्या घरकुल बाबत आज खा.श्रीमती रक्षाताई खडसे यांनी प्रधानमंत्री आवास (शहरी) योजनाचे सचिव मनोज जोशी यांची दिल्ली येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

अलीकडेच महाराष्ट्रातील विविध विभागांतर्गत मंजुर घरकुलांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बैठक झालेली असून पीएमएवाय च्या कम्प्लिशन सर्टिफिकेट रिलीज केले नसल्यामुळे तसेच मागील सरकारशी विभागाचा ताळमेळ नसल्यामुळे लाभार्थ्यांना पुढील हप्ता मिळणेसाठी विलंब झाला. तरी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबधितांना सूचना केल्या असुन कम्प्लिशन सर्टिफिकेट रिलीज होताच पुढील हप्त्याचा निधी वर्ग करण्यात येईल, अशी माहिती सचिव मनोज जोशी यांनी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांना दिली.

दरम्यचू, या योजनेसाठी नेमण्यात आलेले शहर स्तरीय तांत्रिक कक्ष (सीएलटीसी) कर्मचार्‍यांची पुणे येथे बैठक झालेली आहे. तसेच त्यांचे बाकी असलेले मानधन लवकर त्यांना मिळणार असुन योजनेला लागलेल्या ब्रेकनंतर पुन्हा योजना गतिमान होणार आहे अशी माहिती यावेळी मंत्रालयामार्फत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांना देण्यात आली.


Protected Content

Play sound