यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव हे गाव हागणदारीमुक्त होणेबाबत हिंदवी स्वराज्य सेनेच्या वतीनं यावल तालुका गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे.
या निवेदानात, “यावल तालुक्यातील किनगाव हे गाव मुख्य बाजारपेठ असून आजूबाजूचे लोक गावात कामानिमित्त येत असतात. या गावात पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालय नाही तर खूप महिलांसाठी जुने शौचालय आहेत मात्र त्यांची स्वच्छता होत नाही. त्यात लाईट आणि पाण्याची व्यवस्था नाही. नवीन तयार झालेली शौचालय निकृष्ट दर्जाची असल्यामुळे संपूर्ण गावाचं आरोग्य धोक्यात आलं असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.
नायगाव रस्ता गाव विहिरीजवळ नवीन शौचालय, चौधरी वाडा, ठाकूर वाडालगत महिला आणि पुरुषांचे नवीन शौचालय बांधण्यात आले असून ते निकृष्ट दर्जाचं आहे. त्यामुळे त्या संदर्भात चौकशी लावून आपण संबंधितांवर कारवाई करावी; अन्यथा गावातील संपूर्ण महिला वर्गाकडून आंदोलन करण्यात येईल. गाव हागणदारीमुक्त मुक्त कसं होईल या अनुषंगाने प्रयत्न व्हायला हवेत.” असं हिंदवी स्वराज्य सेनेचे अध्यक्ष मोहन पाटील यांनी पत्रकात म्हटलं आहे.