युवासेनेच्या स्वाक्षरी मोहीमला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठी माणसांविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शहरातील युवासेनेच्या वतीने रविवारी ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता काव्यरत्नावली चौकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

 

गुजराथी आणि मारवाडी लोक निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, अशा आशयाचे वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांच्या या वक्तव्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ जळगावातील काव्यरत्नावली चौकात रविवारी ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

याप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, महापौर जयश्री महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, महानगर युवाधिकारी विशाल वाणी, उपजिल्हा युवाधिकारी पियुष गांधी, अमित जगताप, प्रीतम शिंदे, अमोल मोरे, राहुल पोतदार, जय मेहता, अभिजित रंधे, सागर कुटुंबळे, महेश ठाकूर, गणेश गायकवाड, प्रशांत फाळके, उमेश चौधरी, गिरीश चौधरी, पंकज जोशी, निलेश जोशी, विलास पवार, बन्सी माळी, वासिम खान, ललित धांडे आदी उपस्थितीत होते.

Protected Content