Home राजकीय मी मुलाखत दिली तर भूकंप होईल ! : एकनाथ शिंदे

मी मुलाखत दिली तर भूकंप होईल ! : एकनाथ शिंदे

0
51


मालेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे. वेळ आल्यानंतर त्यावर भाष्य करणार असून मी ज्यावेळी मुलाखत देईल तेव्हा भूकंप होईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगाव येथे बोलतांना उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. आम्ही गद्दारी केली असती तर राज्यभरातून समर्थन मिळालं नसतं. राज्यातून आम्हाला समर्थन का मिळते याचा विचार तुम्ही करा,शिवसेना अशीच मोठी झालेली नाही, त्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावली आहे. शिवसेनाला मोठं करण्यासाठी दिवस रात्र एक केली आहे. त्यामुळे बंडाचा शिक्का आमच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न करु नका. तुम्ही जनतेचा विश्वासघात केला आहे. आमची भूमिका कुणाच्याही विरोधात नाही.

ठाकरेंनी आमची भूमिका समजून घेतली नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि दिघेंच्या विचारांवर पुढे जात आहोत. त्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही. अतिवृष्टीचे पंचनामे १०० टक्के पूर्ण झाले आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

 


Protected Content

Play sound