Home Cities जळगाव म्हसावद येथे संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त मिरवणूक

म्हसावद येथे संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त मिरवणूक


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातून शोभायात्रा कळस मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला हाते.

 

जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी २७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावातून शोभायात्रा कळस मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमात म्हसावद येथील ज्ञानेश्वर भजनी मंडळ यांनी सहभाग नोदविला. त्याचप्रमाणे सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन गावातील माळी समाजाताील ज्येष्ठ नागरीकांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आत्माराम महाजन, दगा महाजन, राजेंद्र महाजन, संतोष महाजन, नाना महाजन, प्रवीण महाजन, एकनाथ महाजन, जितेश महाजन, दिपक महाजन यांच्यासह आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound