मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे शिवसेनेला गळती लागली असतांना उध्दव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका ही कोर्टाने स्वीकारली असून यावर १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
शिवसेनेत वर्चस्व कोणाचे आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर अधिकार कोणाचा, या दोन मुद्दय़ांवरील निवडणूक आयोगापुढील सुनावणीला शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देण्याची विनंती करणारा अर्ज शिवसेनेने सुप्रीम कोर्टात दाखल केला आहे. सुप्रीम कोर्टाने हा अर्ज मान्य केला असून सुनावणीची तयारी दर्शवली आहे.
पक्ष संघटनेतील वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि शिवसेनेला दिले आहेत. मात्र, अशा पद्धतीने कागदपत्रांची मागणी करणे हा न्यायालयाच्या जैसे थे आदेशाचा भंग होतो, असं शिवसेनेचं म्हणणे आहे. त्यामुळे न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कृतीची दखल घेऊन सुनावणी स्थगित करावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्यानुसार सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली असून १ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.