जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाच्या दोन वर्षाच्या कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी सुधा श्रीकांत खटोड तर सचिवपदी दीप्ती अग्रवाल यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी कोषाध्यक्ष म्हणून अल्पना शर्मा व पीआरओ म्हणून सोनल संजय गांधी यांच्या कार्यकारिणीने शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.
पदग्रहण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष प्रमिला दुसाद, प्रांत सचिव कंचन सोनी, प्रांत कोषाध्यक्ष पुष्पा खंडेलवाल, प्रांत प्रमुख अंशू अग्रवाल, सुषमा झंवर हे उपस्थित होते. यावेळी मावळते अध्यक्ष प्रतिभा अग्रवाल यांनी मागील वर्षाच्या कामाचा आढावा सांगितला तर मावळत्या सचिव सुधा खटोड यांनी मागील वर्षाचा अहवाल सादर केला.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करण्यात आली. पुनम वर्मा, नितू सोनी, मोनिका शर्मा, पूजा अग्रवाल, नीलकमल या तरुणींनी ही वंदना सादर केली. यानंतर प्रियंका त्रिपाठी, अनुराधा दायमा, मंगला दायमा यांनी उत्कृष्ट तलवारबाजी प्रदर्शन करून दाखविले. यानंतर श्रावण महिन्याच्या सांस्कृतिक बाबींवर कार्यक्रम सादर झाला. यामध्ये महिलांसाठी श्रावण सरीवर विविध खेळ घेण्यात आले. महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला.
यानंतर नवीन कार्यकारिणीने मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पदभार स्वीकारला. नूतन अध्यक्ष सुधा खटोड यांनी, आगामी दोन वर्षात महिला सक्षमीकरणावर तसेच पर्यावरण विकासावर भर देणार असल्याचे सांगत सामाजिक विकासाच्या बांधिलकीसाठी दक्ष राहणार असल्याचे सांगितले.
नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी सुधा खटोड, उपाध्यक्षपदी सुनीता दमानी, सचिव दीप्ती अग्रवाल, सहसचिव शितल कासट, कोषाध्यक्ष अल्पना शर्मा, प्रसिद्धी प्रमुख सोनल गांधी, पर्यावरण समिती सुषमा बाहेती व सुरेखा कोठारी, महिला सशक्तिकरण नीतू सोनी, पूनम वर्मा, कार्यकारणी सदस्य उषा सिखवाल, मनीषा दायमा, अर्चना शर्मा, प्रवीण मुंदडा, सीमा गांधी यांचा समावेश आहे.