जळगावात सकल हिंदू समाजाचा मुक मोर्चा (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । देशात हिंदू समाजावर वाढलेल्या हिंसाचार हा दिवसेंदिवस वाढत असून समाज बांधवांना जीवे ठार मारण्याच्या खुले आम धमक्या दिले जात आहे. हा प्रकार थांबला पाहिजे यासाठी रविवारी २४ जुलै रोजी सकल हिंदू समाजाच्या विविध संघटनांनी एकत्रित येवून शास्त्री टॉवर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुक मोर्चा काढण्यात आला.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, देशात वाढलेला हिंचाचार आपल्या देशात हिंदू समाज सध्या दहशतीच्या सावटाखाली आहे. लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद सारखे अनेक जिहाद हिंदू समाजावर आक्रमण करीत आहेत. याशिवाय हिंदू मंदिरांची नासधूस करणे, देवी-देवतांवर असभ्य भाषेत टीका-टिपणी करणे, हिंदू समाज बांधवांना जीवे मारण्याच्या खुले आम धमक्या देणे हे प्रमाण वाढत चालले आहे. हा सर्व प्रकार थांबला पाहीजे यासाठी जळगाव शहरातील सकल हिंदु समाज एकत्रीत येवुन शास्री टॉवर येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुक मोर्चा काढण्यात आला. या मुकमोर्चात हजारोंच्या संख्येत सहभागी झाले. मार्चाच्या अग्रस्थानी भारतीय संविधान हाती घेऊन बालीका व राष्ट्रध्वद व भगवाध्वज सोबत ५ मशालधारी हाती घेऊन सुरूवात करण्यात आली. मुक मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी मोर्चात योगेश्वर गर्गे यांनी मार्गदर्शन केले तर सुत्रसंचालन नारायण अग्रवाल आणि आभार मोहन तिवारी यांनी मानले. या मोर्चात सर्व हिदुत्ववादी संघटना, विश्व हिंदु परीषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, सार्वजनिक गणेश महामंडळ, हिंदु महासभा, हिंदु जागरण मंच, हिंदु राष्ट्रसेना, शिवप्रतिष्टान हिंदुस्थान, सनातन संस्था, एमआयडीसीतील उद्योजक, व्यापारी संघटना, विविध आध्यात्मिक क्षेत्रांतील महंत यांच्यासह शहरातील विविध समाजाचे प्रतिनिधी व प्रतिष्ठित व्यक्ती आदींनी सहभाग नोंदविला.

भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/624059822697713

भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/353248976996657

भाग 3
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/423751633120324

भाग ४
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/423751633120324

भाग ५
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1701037116895932

Protected Content