यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राज्याचे माजी अर्थमंत्री तथा विरोधी पक्षनेते ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदिवासी वस्तीत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
शहरालगत असलेल्या नगर परिषदच्या पाणीपुरवठा फिल्टर हाऊसजवळ असलेल्या आदिवासी वस्तीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा यावल नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांच्या हस्ते हातावर पोट भरून मोलमजुरी करणाऱ्या आदिवासीच्या चिमकुल्या होतकरू शाळकरी विद्यार्थीना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यात वहया ,पेन, पेन्सील व त्याच बरोबर पोष्टीक आहार म्हणुन बिस्कीट व खाऊची पाकीटे वाटप करण्यात आलीत. त्यांच्या सोबत राष्ट्रवादी आदिवासी सेलचे जिल्हा अध्यक्ष एम. बी. तडवी यांनी आदिवासी मुलांना व पालकांना शिक्षणाचे महत्व व शासनाच्या वतीने मिळणाऱ्या मुलभुत सुविधा ,शासकीय सवलती या संदर्भात सखोल माहीती देवुन मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रा. मुकेश येवले, एम. बी. तडवी, बोदडे नाना, अमोल दुसाने, देवकांत पाटील, कामराज घारु, अरुण लोखंडे, बापु जासुद मोहसीन खान, डाॅ. हेमंत येवले, अजय बारेला , पितांबर महाजन, हितेश गजरे, प्रा. कामडी, प्रा. ठिगळे , सुपीयान खान , नामसिंग बारेला ,चंपालाल बारेला ,भारत बारेला, दिनेश वडर , लक्ष्मण बारेला व यांच्यासह असंख्य महीला कार्यकर्त्या उपस्थितीत होत्या.