Home Cities धरणगाव धरणगावात विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण

धरणगावात विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण

0
33

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  येथील गुड शेपर्ड स्कुलमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील ३ वर्षांपासून गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल येथे सातत्याने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे कार्य सुरू आहे. शाळेचा परिसर व्यापक असल्याने मोकळ्या जागेत झाडे लावून ती जगवण्यासाठी शाळा प्रयत्नशील आहे. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. गुड शेपर्ड शाळेतील मनस्वी पाटील, पूर्वा जाला, श्रुष्टी गुजर, धनश्री महाजन या विद्यार्थिनींनीच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांच्यासह पूनम कासार, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार, सागर गायकवाड आदी शिक्षक तसेच हस्नेन खान, शिवचरण महाजन, जुएब शेख, कृष्णा पाटील हे विद्यार्थी देखील उपस्थित होते.


Protected Content

Play sound