Home धर्म-समाज पाचोरा रोटरी क्लबतर्फे बिछायत भेट

पाचोरा रोटरी क्लबतर्फे बिछायत भेट

0
43

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील ‘रोटरी क्लब ऑफ पाचोरा – भडगाव व ‘दिशा डेंटल केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील संघवी कॉलनीमधील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रात भाविकांसाठी बिछायत भेट देण्यात आली.

केंद्रात विविध दैनंदिन व विशेष धार्मिक कार्यक्रमाकरिता सेवेकरी बंधू-भगिनींना बसण्याची सोय व्हावी या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष डॉ. अमोल जाधव, सेक्रेटरी डॉ. गोरखनाथ महाजन, केंद्राचे प्रमुख गोकुळ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी आलेल्या सर्व रोटेरियन बांधवांचे श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अतुल शिरसमणे यांनी रोटरीचे विविध उपक्रम व सेवाभावी प्रकल्प याबद्दल माहिती सांगितली.

केंद्राचे जेष्ठ सेवेकरी राम जळतकर यांनी श्री. स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्राच्या उपक्रमांची माहिती रोटरी क्‍लबच्या सदस्यांना करून दिली. ज्येष्ठ सेवेकरी संजय पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. तर सेवेकरी नरेश गर्गे यांनी आभार मानले.

या प्रसंगी रोटरी क्लबचे भरत सिनकर, चंद्रकांत लोढाया, राजेश मोर, डॉ. विशाल पाटील, रोहन पाटील, रावसाहेब बोरसे, शैलेश खंडेलवाल, रमेश वारुळे, संजय पाटील सह सेवेकरी बंधू – भगिनी उपस्थित होते.


Protected Content

Play sound