Home Cities एरंडोल महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा तेरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा तेरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा

0
260


एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा तेरावा वर्धापन दिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला.

येथील बँक शाखेत आज बुधवार, दि.२० जुलै  रोजी वर्धापन दिवसाच्या अनुषंगाने आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली. बँकेच्या सेवा, विविध ठेव योजना, कर्ज योजना याबाबत ग्राहकांना माहिती देण्यात आली. नागरिकांनी बँकेचे खातेदार होऊन बँकेला सेवेची संधी द्यावी. असे आवाहन यावेळी करण्यात आले.

शाखा व्यवस्थापक कुणाल काटकर यांनी प्रास्ताविक करत व ग्राहकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. सृष्टी रंगारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सज्जन डायमा व सलीम शेख यांनी आभार प्रदर्शन केले.


Protected Content

Play sound