जळगाव जिल्हा सर्व सेवा समितीची जागा सील

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खादीच्या प्रचारासाठी दिलेल्या जागेचा अनधिकृतरित्या व्यावसायिक वापर होत असल्याच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशान्वये तहसीलदार विशाल सोनवणे शास्त्री टॉवर चौकातील जळगाव जिल्हा सेवा समितीची जागेसह हॉटेल पक्वान्न प्रेस्टीज व इतर दुकानांना सील लावण्यात आले.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील शास्त्री टॉवर चौकातील जळगाव जिल्हा सर्व सेवा समितीला शासनाने खादीच्या प्रचारासाठी शासनाने १ हजार ६०० स्क्वेअरफूट जागा शासनाच्या वतीने सन १९६५-६६ मध्ये देण्यात आली होती. शासनाच्या करारानुसार ही जागा कोणत्याही पध्दतीने भाडेतत्त्वावर देण्याची परवानगी नसतांना जळगाव जिल्हा सर्व सेवा समितीने या जागेत  हॉटेल पक्वान्न प्रेस्टीज आणि इतर दुकानांना प्रत्येकी तीन वर्षांसाठी २० हजार रूपये महिन्यांने देण्यात आली आहे. शासनाच्या करारानुसार  जळगाव जिल्हा सर्व सेवा समितीने नियमांचा भंग करून स्वत:च्या फायदा करून शासनाची फसवणूक केली जात आहे. अशी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता दिपक गुप्ता यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे ११ जुलै रोजी केली होती. त्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शासनाची जागा सिल करण्याचे निर्देश दिले. सोमवारी १८ जुलै रोजी दुपारी तहसीलदार विशाल सोनवणे यांनी पोलीस बंदोबस्तात पथकाच्या मदतीने सेवा समितीची जागा, हॉटेल पक्वान्न प्रेस्टीज व इतर व्यवसाय दुकानांना सील करण्यात आले.

 

याप्रसंगी नायब तहसीलदार विशाल सोनवणे, शहर तलाठी रामेश्वर जाधव, मंडळाधिकारी आर. टी. वंजारी, मंडळाधिकारी योगेश ननवरे, शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे, एलसीबी पथकाच्या  धनश्री दुसाने, पोलीस कॉन्स्टेबल मनोज घुले, माहिती अधिकार कार्यकर्ता  दीपककुमार गुप्ता आदी उपस्थित होते.

Protected Content