जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कुंसुंबे खुर्द येथे शनिवार दि. १६ जुलैपासून मोफत बुस्टर डोस लसिकरणाची सुरुवात करण्यात आली.
कुसुंबे खुर्द येथे शनिवार दि. १६ जुलै रोजी कुसुंबे खुर्द येथे १८ वर्षावरील नागरिकांना मोफत बुस्टर डोस लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नागरीकांनी लसीकरणास उत्तम प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. या लसीकरणाप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गंगाधर घुगे, वैद्यकीय अधिकारी जयश्री सोनार, आरोग्य सेवक दिलीप ठाकुर , आशा सेविका वंदना पाटील अंगणवाडी सेविका शशिकला पाटील , उमा पाटील यांनी परीश्रम घेतले. कुंसुंबे गांवाला बुस्टर डोस उपलब्ध करुन दिल्याबद्दल आरोग्य यंत्रणेचे गावकऱ्यांनी मनापासून आभार मानले.