Home राजकीय अमित शहा आरोप सिद्ध करा,अन्यथा तुम्हाला तुरुंगात टाकेन : ममता बॅनर्जी

अमित शहा आरोप सिद्ध करा,अन्यथा तुम्हाला तुरुंगात टाकेन : ममता बॅनर्जी

Mamata Amit Shah
Mamata Amit Shah

Mamata Amit Shah
 

कोलकाता (वृत्तसंस्था) विद्यासागर यांचा पुतळा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तोडला, याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि तुम्ही आमच्यावरच आरोप करता. खोटे बोलायला तुम्हाला लाज वाटत नाही का? आमच्यावर केलेले आरोप सिद्ध करा. अन्यथा तुरुंगात टाकेन, असा इशारा तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहांना दिला आहे.

 

कोलकात्यात अमित शहांच्या रोड शोवेळी झालेला हिंसाचार आणि त्यानंतर शहांनी तृणमूलवर केलेले आरोप या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी बोलत होत्या. शहांचे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत, असा दावा त्यांनी केला. यावेळी भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांनाही ममता यांनी लक्ष्य केले. ‘आम्ही विद्यासागर यांचा पुतळा उभारु, असे मोदी म्हणतात. बंगालकडे पुतळा उभारण्यासाठी पैसा आहे. तुम्ही पुतळा उभाराल. पण 200 वर्षांचा वारसा पुन्हा आणू शकाल का?’, असा सवाल ममता यांनी उपस्थित केला. दरम्यान, निवडणूक आयोग भाजपाचा भाऊ आहे. आधी आयोग निष्पक्ष होता. मात्र आता निवडणूक आयोग विकला गेला आहे, अशी टीका देखील ममता यांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound