जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना रजेवर कारागृहाबाहेर पडून फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अमळनेर शहरातून अटक केली आहे.
वसंत ऊर्फ जयकुमार ढोमन अहिरे रा. भोईवाडा, अमळनेर अस अटकेतील या आरोपींच नाव आहे.
अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्हयात वसंत अहिरे यास अमळनेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा भोगत असतांना ५ जून रोजी आरोपी अहिरे यास कोरेाना अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. मात्र त्यानंतरही मुदतीत आरोपी वसंत कारागृहात पुन्हा दाखल झाले नाही. त्यामुळे याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी वसंत हा अमळनेरात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे किरणकुमार बकाले यांना मिळाल्यावर पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील, प्रवीण मांडोळे या कर्मचाऱ्यांनी आरोपी वसंत अहिरे यास अमळनेर शहरातून अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.