


जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात गणाचार्य श्री 108 विराग सागर महाराज यांचे सुशिश्य परमपूज्य श्रमणमुनी श्री 108 विशेष सागर महाराज यांचा 26 वा चातुर्मास कलश स्थापना आज करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याचे माजी जलसंपदा मंत्री तथा आमदार गिरीश महाजन उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार ईश्वर बाबूजी जैन, नगराध्यक्ष सौ. साधनाताई महाजन, माजी नगराध्यक्ष राजू शेठ बोहरा, शिक्षण संस्थेचे सचिव सुरेश चंद्रजी धारिवाल हे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती पारसनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मोहन जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चातुर्मासाचे महत्त्व सांगताना यावेळी परमपूज्य विशेष सागर जी महाराज म्हणाले की, चातुर्मासामध्ये साधू आराधना व साधना करीत असतात. श्रावकांना या चार महिन्यात साधूंची भक्ती व सेवा करून त्यांना पुण्याचा लाभ मिळतो. या चार महिन्यात विशेष त्याग व तपस्या करून श्रावकही पुण्य प्राप्त करतात.
दिगंबर संत आठ महिने भ्रमण करून चातुर्मासात चार महिने एकाच ठिकाणी थांबत असतात. पावसाळा ऋतू मध्येच चातुर्मास येत असल्याकारणाने या ऋतूत असंख्य जीव उत्पन्न होत असल्याने त्यांची रक्षा हेतू व अहिंसा धर्माचे पालन करण्यासाठी दिगंबर संत एकाच ठिकाणी चार महिने थांबून योग धारण करतात या कालावधीत विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात अशी माहितीही मनुष्री विशेष सागर महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आज 13 जुलै 2022 रोजी दुपारी तीन वाजता कलश स्थापना होणार असून दिगंबर जैन मंदिरापासून जैन ओसवाल मंगल कार्यालयापर्यंत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमास समाज बांधवांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन दिगंबर दिन समाज अध्यक्ष मोहन जैन यांनी केले आहे.



