Home Cities जळगाव सोनी नगरातील स्वयंभू महादेव मंदिरात स्थापनादिनानिमित्त महाआरती

सोनी नगरातील स्वयंभू महादेव मंदिरात स्थापनादिनानिमित्त महाआरती

0
58


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सोनी नगरातील स्वयंभू महादेव मंदिराच्या स्थापना दिनानिमित्त उपमहापौर कुलभूषण पाटील व विजय राणा यांच्या हस्ते महादेवाची महाआरती करण्यात आली.

 

प्रिंप्राळा येथील सोनी नगर परिसरातील स्वयंभू महादेव मंदिराची स्थापना दि.११जुलै २०१८ सोमवार रोजी करण्यात आली होती. आज स्थापनेस सोमवार दि.११ जुलै २०२२ रोजी ५ वर्ष पूर्ण होत आहे. याचे औचित्य साधून सकाळी १०.३० वाजता उपमहापौर कुलभूषण पाटील व कस्तूरी सुपर शॉपचे संचालक विजय राणा यांच्या हस्ते महादेवाची महाआरती व दुग्धअभिषेक करण्यात आले. यावेळी स्वयभु महादेव मंदिराच्या जीर्णोधारसाठी जी काही मदत लागेल त्यासाठी महापालीकेच्या माध्यमातून व माझ्या परीने मंदिरासाठी जी काही मदत करता येईल त्यासाठी मी कटिबद्ध राहिल असे आश्वासन उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिले. याप्रसगी बिल्डर धनराज इंगळे, विनोद निकम, धनराज कुंभार, भगवान माळी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सोनी नगर परीसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक, शिवभक्त उपस्थित होते.


Protected Content

Play sound