Home Cities जळगाव रमजान जकात अंतर्गत युवराज चौधरीला बिरादरीतर्फे ऑपरेशनसाठी मदत

रमजान जकात अंतर्गत युवराज चौधरीला बिरादरीतर्फे ऑपरेशनसाठी मदत

0
21

WhatsApp Image 2019 05 14 at 8.32.05 PM

जळगाव(प्रतिनिधी) जिल्हा मानियार बिरादरीतर्फे पवित्र रमजान महिन्यात जकात जमा करणे व जकात वाटणे सुरू असतांना बिरादरीला एक अंध व्यक्ती ऑप्रेशनच्या खर्चासाठी फिरत असल्याचे समजल्याने त्यास आर्थिक मदत करण्यात आली.

 

अंध व्यक्ती युवराज गोकुळ चौधरी हे आपल्या परिवारासह स्वतःच्या डोळ्याच्या मोती बिंदूसाठी आर्थिक मदतीसाठी फिरत असतांना ब्लाइंड फेडरेशनचे राजेंद्र जायभय यांनी मानियार बिरादरीचे कार्यालयात त्यांना आणले असता बिरादरीतर्फे त्यांना त्वरित पाच हजाराची आर्थीक मदत धनादेश द्वारे देण्यात आले. धनादेश बिरादारीचे हारून शेख, सादिक शेख, फारूक शेख यांच्या हस्ते देण्यात आले. तेव्हा त्यांच्या पत्नी वैशाली चौधरी,मुलगा सार्थक,मुलगी श्रावणी व राजेंद्र जायभय उपस्थित होते.

रोजेदार कैदी ना सुध्दा सहकार्य
जळगाव कारागृहात सुद्धा वीस ते बावीस रोजेदार बंदी असून त्यांना सुद्धा इफ्तार व सहेरीसाठी कायदेशीर पद्धतीने अधीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बिरादरीतर्फे सहकार्य करण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound