यंदा मान्सून ४ दिवस उशिरा

monsoon1

मुंबई ( वृत्तसेवा) नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून यंदा ४ जूनला भारतात दाखल होणार असल्याची माहिती स्कायमेट या हवामानाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने दिली आहे. दरवर्षी मान्सून केरळमध्ये १ जूनला दाखल होतो. यंदा तो चार दिवस उशिरा येण्याची शक्यता आहे. यंदा ४ जूनला येणार असल्याचा अंदाज आहे.

मान्सून चार दिवस विलंबाने तर येणारच आहे, शिवाय यावर्षी सामान्य पाऊसमानापेक्षाही कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. स्कायमेटचे सीईओ जतीन सिंह म्हणाले, ‘यावर्षी देशाच्या सर्व चार भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडेल. पूर्व, ईशान्य आणि मध्य भारतात उत्तर पश्चिम भागात आणि दक्षिणेला कमी पाऊस पडणार आहे.’ या संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, २२ मे रोजी मान्सून अंदमान निकोबार द्वीपसमूहापर्यंत पोहोचू शकतो. २०१८ सालीही मान्सून समाधानकारक नव्हता. १२ क्षेत्रात दुष्काळी परिस्थिती उद्भवली होती.

Add Comment

Protected Content