Home Cities धरणगाव आ. गुलाबराव पाटील यांचे विठुरायाला साकडे

आ. गुलाबराव पाटील यांचे विठुरायाला साकडे

0
28

पंढरपूर, लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा– राज्याचे माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रूक्मीणीचे दर्शन घेऊन सर्वांना सुख-समृध्दीत ठेवण्यासाठी साकडे घातले.

माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील हे पंढरीच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहेत. गेल्या सुमारे तीन दशकांपासून ते नित्यनेमाने वारीला जात असतात. अगदी कोरोनाच्या काळात देखील त्यांनी मंदिराच्या बाहेरून विठुरायाचे दर्शन घेतले होते. यंदा आषाढी वारीला परवानगी दिल्यानंतर आज आ. गुलाबराव पाटील यांनी पंढरपूर येथे जाऊन श्री विठ्ठल-रूक्मीणीचे दर्शन घेतले.

याप्रसंगी आ. गुलाबराव पाटील यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृध्दीसाठी साकडे घातले. विशेष करून चांगला पाऊस पडून बळीराजाला चांगला हंगाम मिळून आबादानी व्हावी यासाठी त्यांनी प्रार्थना केली.


Protected Content

Play sound