जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । असंघटित, कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेच्या वतीने महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गुरूवार ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता एक दिवसीय लक्षवेधी उपोषण करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या विविध विभागांमध्ये असंघटीत दलीत बहुजन समाजातील मजूरांना २६० ते ३०० रूपये प्रतिदीन पगार देवून त्यांचा पीएफ न भतरा राज्य कामगार, विमा न भरता शोषण केले जात आहे. कंत्राटी मजूर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराचा मनुष्यबळ पुरविण्याचा परवापना करारपत्र, ईपीएफ नोंदणी, राज्य कामगार, विमा प्रमाणपत्र, कंत्राटी मजूरांना बँकेमार्फत त्याच्या खात्यात जमा केलेला पगार, पगार स्लीप, कंत्राटी मजूर ठेका याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी आणि कंत्राटी मजूरांकडून करारपत्र लिहून घेताना त्याचा पगार त्यांच्या बँक खात्यात जमा करावे या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेच्या वतीने एक दिवसीय लक्षवेधी उपोषण करण्यात आले.
या उपोषणात खान्देश संपर्क प्रमुख शिवाजी पाटील, कार्याध्यक्ष शांताराम बडगुजर, जिल्हा संपर्क प्रमुख रविंद्र पाटील, संजय वंजारी, योगीराज पळशीकर यांनी सहभाग नोंदविला होता.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1021100735201020