मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधासभागृहात आपण ‘मी पुन्हा येणार’ ही कविता म्हटल्यावरून अनेकांनी माझी खूप टिंगल उडविली. मात्र ‘मी आलो, आणि त्यांनाही घेऊन आलो !’ अशा मिश्कील शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
राज्य सरकारने आज विश्वासमत प्राप्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार प्रदर्शनात बोलतांना जोरदार टोलेबाजी केली. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या आजवरच्या वाटचालीचे कौतुक केले. शिंदे हे २४ तास अव्याहतपणे काम करणारे आणि जमीनीशी जुडलेले नेते आहेत. त्यांनी अनेक अडचणींवर मात करून आजवरची वाटचाल केली असून त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावरून वाटचाल करणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, महाविकास आघाडी बनल्यावर ही आघाडी अनैसर्गिक असून ती टिकणार नसल्याचा दावा केला होता. तेव्हा मी सभागृहात म्हटलेल्या ‘मी पुन्हा येईल’ या कवितेवर जोरदार टिका झाली. सर्वांनी याची मोठी टिंगल उडविली. मात्र ‘मी पुन्हा आलो’, फक्त आलोच नाही तर त्यांना देखील घेऊन आलो. आणि आज पुन्हा सत्तेत आलो असून मी त्यांच्यावर सूड उगवणार आहे. आणि तो सूड म्हणजे मी त्यांना माफ करणार असल्याचे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. आज सभागृहात काही लोक ईडी-ईडी ओरडत होते. मात्र ही मंडळी ईडी म्हणजेच एकनाथ आणि देवेंद्र यांच्यामुळेच इकडे आल्याची मिश्कील टिपण्णी त्यांनी केली.