Home Cities अमळनेर मंगळ ग्रह मंदिराबाहेर भव्य शेडची उभारणी

मंगळ ग्रह मंदिराबाहेर भव्य शेडची उभारणी

0
33

अमळनेर प्रतिनिधी । येथील श्री मंगळ देव ग्रह मंदिराबाहेर भाविकांच्या सुविधेसाठी भव्य शेडचे निर्माण करण्यात आले असून प्रा. डी. डी. पाटील यांच्याहस्ते याचे उदघाटन करण्यात आले.

या शेडची लांबी १०० फूट रूंदी २५ फूट तर उंची १८ फूट आहे. उन्हाळयाच्या पार्श्‍वभूमीवर एका आठवडयात किशोर पिंपळे यांनी हे काम पूर्ण केले. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे बांधकाम सल्लागार संजय पाटील यांनी शेडचे डिझाईन तयार केले आहे. दरम्यान, या शेडच्या उदघाटन प्रसंगी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, विश्‍वस्त अनिल अहिरराव व सौ. जयश्री साबे यांच्यासह भाविक उपस्थित होते. मंगळ ग्रह सेवा संस्था करीत करीत असलेल्या कार्याचे प्रा. डी. डी. पाटील यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. याशिवाय, सौ.साबे यांची मंगळ ग्रह संस्थेच्या विश्‍वस्त पदी निवड झाल्या बद्दल त्यांनाही प्रा.पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound