यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील मारूळ येथील हेल्प चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये संजय गांधी निराधार समितीचे सदस्य तथा काँग्रेस पक्षाचे सैय्यद जावेद अहमद यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन गोदावरी फाऊंडेशन (हॉस्पिटल) जळगावच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत मारुल व सय्यद सईद आलम यांनी संयुक्तपणे केले होते.
या रक्तदान शिबीर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुळचे सरपंच तथा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे तालुका उपाध्यक्ष सैय्यद असद अहमद हे होते. सदरच्या शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या मध्ये मारुळ सरपंच सैय्यद असद, डॉ. अवसफ सैय्यद, डॉ. सैय्यद मो हनिफ, सैय्यद अदनान,प्रदिप तायडे, उदय तायडे, अतुल तायडे, अक्षय तायडे, निलेश बाऱ्हे, संदिप तायडे, निखिल तायडे, कैसर उद्दीन सैय्यद, शेख शफीक, सैय्यद रिजवान, सैय्यद शवकत,ख्खाजा जुबेर, सैय्यद फैजान, सैय्यद नुरुल अमिन, सैय्यद नविद अख्तर, सैय्यद मुनसफ अली, सैय्यद परवेज अख्तर, ख्खाजा साबिर अहमद इत्यादीनी रक्तदान केले. सदरच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी चेअरमन सैय्यद जियाउलहक, पोलिस पाटील नरेश मासोळे, ग्रा.प.सदस्य सिताराम पाटील, मुक्तार उद्दीन फारुकी, सुलतान पटेल ऊर्फ मुदसरनजर सैय्यद, एकनाथ पाटील, अमिर तडवी,कॉग्रेस अल्पसंख्याक विभागाचे सैय्यद इखलास, ग्रा.से.सघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष बाळू तायडे, चेअरमन कबिरुउद्दीन फारुकी, यशस्वीतेसाठी गोदावरी फाउंडेशनचे डॉ. सईद शेख, डॉ. निविदीता ठाकरे, डॉ. अशितोष उपाध्याय, रक्तपेढी समंयवक लक्ष्मण पाटील, सर्व स्टॉप, कारकुन परवेज सैय्यद, शिपाई नदीम सैय्यद, शफीक फारुकी, कंपाऊडर सैय्यद अफाक, वैभव तायडे, गोलु तायडे, इत्यादी सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.