माझ्या लोकांनीच मला दगा दिला : ठाकरे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । आमच्या सरकारने जनहिताची कामे केली असली तरी आमच्या लोकांनी दगा दिला अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत खंत व्यक्त केली.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली. यात शहरांच्या नामांतराच्या प्रस्तावासह अन्य महत्त्वाचे विषय मंजूर करण्यात आले. याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी आपल्याला सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. ते म्हणाले की, आमच्या लोकांनीच आम्हाला दगा दिला. आम्ही अतिशय चांगले काम केले. लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. मात्र जनतेची सेवा पुढील काळात देखील आम्ही करत राहू. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे विषय मार्गे लागले असून उर्वरित प्रश्न पुढील बैठकीत मार्गी लावू असे देखील ते बोलले.

 

दरम्यान, प्रसारमाध्यमांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रिमंडळ बैठकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी वादाचे मुद्दे उपस्थित करून नंतर सरकारमधून बाहेर पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती. प्रत्यक्षात मात्र तसे काहीही घडले नाही. तर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणे ऐवजी बहुमत चाचणीला सामोरे जाण्याची तयारी केल्याचे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतून दिसून आले आहे. यामुळे आता सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत कोर्ट नेमका काय निर्णय देणार ? आणि बहुमत चाचणी जर उद्या झालीच तर यात कोण बाजी मारणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content