Home क्राईम शिंदी येथे किरकोळ वादातून एकावर चाकूहल्ला

शिंदी येथे किरकोळ वादातून एकावर चाकूहल्ला


chaku halla1
 

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील शिंदी येथे घराचे काम सुरू असताना बांधकामाचे मटेरियल गटारामध्ये पडल्यामुळे झालेली घाण स्वच्छ कारणावरून दोन जणांमध्ये झालेल्या वादातून एकाने चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

 

शिंदी येथे गुरांचे डॉक्टर सचिन महाजन यांच्या घराचे काम सुरू आहे. घरा शेजारील गटारीमध्ये बांधकामाचे मटरेल पडल्यामुळे घाण निर्माण झाली होती. त्यांच्या शेजारी राहणारे संतोष निकम यांनी सदरील घाण गटारीतून काढून वर टाकल्याने सचिन महाजन व संतोष निकम यांच्यामध्ये वाद झाला. या वादातून संतोष निकम यांनी डॉक्टर सचिन महाजन यांच्यावर चाकूने हल्ला केला. जखमी महाजन यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound