Home आरोग्य गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थ्यांना कोविड लसीकरण

गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थ्यांना कोविड लसीकरण

0
23


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ला नुकतीच सुरवात झाली असून गोदावरी इंग्लिश मिडीयम सीबीऐसई स्कूलमध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कोविड लसीकरण मोहीम नुकतीच राबविण्यात आली.

कोविड पासून बचाव व्हावा या उद्देशाने शासनासह गोदावरी स्कूलच्या प्राचार्य निलिमा चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या हितास्तव कोवीड लसीकरण मोहीम शनिवार दिनांक २५ जून रोजी राबविण्यात आली. या प्रसंगी मेडिकल ऑफिसर डॉ पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिचारिका मंगला दायमा, भावना भिरूड यांनी विद्यार्थ्यांना लस दिल्यात. या उपक्रमासाठी आशा सेविका स्वाती पाटील, आशा लाटे, रुपाली चौधरी यांचे सहकार्य लाभले. सुजाण पालकानिही आपल्या पाल्यांना शाळेत नेऊन लस देऊन घेतल्यात.

 


Protected Content

Play sound