यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल भुसावळ मार्गावरील एका ढाब्याजवळ एस.टी.बस आणि मोटरसायकलचा अपघात झाल्याने या घटनेत मोटर सायकलस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे.
आगार प्रमुख आणि त्यांचे कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचले आहे. यावल भुसावळ मार्गावर आज दिनांक २४ जून रोजी संध्याकाळी ७ ते ७.३० वाजेच्या सुमारास शहरापासून किमान एक किलोमीटर लांब असलेल्या महाराष्ट्र गुजरात ढाब्याजवळच्या मार्गावर औरंगाबादहून यावलला येणाऱ्या यावल आगारातील एसटी बस (क्रमांक एम.एच. २० एल. २३९७) या बसचे चालक पी.एन.पवार यांचा पावसात रस्त्याचा अंदाज चुकल्याने एसटीने मोटर सायकलला (क्रमांक एम.एच. १९ बी.बी.३३६५) धडक दिल्याने या अपघातात यावलहून भुसावळकडे जाणारे यावल जनता सहकारी बँकेचे कर्मचारी जखमी झाले आहे. या आधीही महाराष्ट्र गुजरातढाब्या समोरच्या मोटर सायकलचे मोठे अपघात झाले असून त्यात दोन मजुरांनाचा यात मृत्यू झाला होता.
अपघाताची माहीती मिळताच यावल आगाराचे व्यवस्थापक जितेन्द्र जंजाळ, वाहतुक नियंत्रक के.डी.चौधरी आणि सहकाऱ्यांनी अपघाताच्या ठिकाणी येत पाहणी केली असून अपघाताचा पंचनामा पोलीसाच्या मदती करण्याचे काम सुरू असल्याचे वृत्त आहे.