Home क्राईम सावदा येथील एकाची गळफास घेवून आत्महत्या

सावदा येथील एकाची गळफास घेवून आत्महत्या


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील तडवी वाड्यात राहणारा ४१ वर्षीय प्रौढ व्यक्तीने घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली आहे. याबाबत सावदा पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

 

शशीकांत मधुकर लोखंडे (व-४१) रा. तडवी वाडा, सावदा ता. रावेर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शशीकांत लोखंडे हे आपल्या पत्नी व तीन मुलांसह शहरातील तडवीवाडा येथे वास्तव्याला आहे. शुक्रवार २४ जून रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी रेशन घेण्यासाठी गावात गेल्या होत्या त्यावेळी शशीकांत हे घरात एकटेच होते. दरम्यान, त्यांनी दोरीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांची पत्नी रेशन घेवून घरी आल्यावर धक्कादायक प्रकार उघडकीला आला. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. शेजारचांच्या मदतीने रावेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत सावद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचे नोंद घेण्याचे काम सुरू होते. मयत शशीकांत यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परीवार आहे.

 


Protected Content

Play sound