यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील खंडेराव महाराज मंदीराजवळील मोकळ्या मैदानात भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी २१ जून रोजी सकाळी सहा वाजता प्राणायामाने योग शिबीराचे उद्घाटन करण्यात आली.
या शिबीरात यावल शहर व परिसरातील नागरीकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी साधकांना पूरक व्यायामाबरोबर विविध प्रकारची आसने शिकविण्यात आले. यावेळी ईश्वर पाटील यांनी सहभागी झालेल्या साधकांना योगा बदल मार्गदर्शन केले.
तर डॉ. कुंदन फेगडे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, योगामुळे अनेक व्याधी दूर होत असल्याचे शास्त्राने सिद्ध केले आहे. नियमित योगासने केल्याने मन प्रसन्न व उत्साही राहते. शरीर व मनाची कार्यक्षमता वाढते. अतिरिक्त वजन कमी होते. वजन कमी असल्यास वाढण्यास देखील मदत होते. त्याचप्रमाणे शरीर व मनावर नियंत्रण करणे शक्य होते. जीवन रोगमुक्त, व्याधीमुक्त, नशामुक्त करण्यासाठी दररोज योगा करणे अत्यंत आवश्यक आहे आणि सर्वांनी योगा करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी किसान मार्चाचे अध्यक्ष नारायण चौधरी, कामगार माथाडी संघटेचे जिल्हाध्यक्ष विय मोरे, भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस उजैनसिंग राजपूत, विलास चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती योगेश भंगाळे, डॉ. कुंदन फेगडे, किशोर कुळकर्णी, नरेंद्र नेवे, पी.एच. सोनवणे, वंदना फेगडे, व्यंकटेश बारी, भूषण फेगडे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रितेश बारी, उपाध्यक्ष मनोज बारी, संजय पाटील, गोपाळ कोळी, एकनाथ पाटील, डॉ. प्रशांत जावळे, रोहिणी फेगडे, डॉ. जागृती फेगडे, स्नेहल जावळे आदी उपस्थित होते. शिबीर यशस्वीतेसाठी सागर लोहार, मनोज बारी, विशाल बारी, शुभम देशमुख आदींनी परिश्रम घेतले.