जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकीचा कट लागल्यावरुन तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, समता नगरात साई बाबा मंदिराजवळ जय राजेंद्र सैंदाणे वय २२ हा तरुण राहतो. रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जय सैंदाणे याच्या दुचाकीचा कट लागल्याने या परिसरात राहणाऱ्या शाहरुख कलीम पिंजारी, समीर कलीम पिंजारी या दोघांनी शिवीगाळ करत जय यास चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दमदाटी केली. याप्रकरणी जय सैंदाणे याच्या तक्रारीवरुन शाहरुख पिंजारी व समीर पिंजारी या दोघांविरोधात रामानंदनगर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील चौधरी हे करीत आहेत.