चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील हनुमानवाडी परिसरात घरकाम करणाऱ्या महिला पायी जात असतांना मागून दुचाकीवरून येवून गळ्यातील ७० हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत धुमस्टाईल लांबविल्याची घटना घडली आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील हुनमानवाडी परिसरात राहणाऱ्या सुषमा प्रमोद पाटील (वय-३५) ह्या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवार १८ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घरी पाय जात असतांना अज्ञात दोघेजण दुचाकीवर येवून महिलेच्या गळ्यातील ७० हजार रूपये किंमतीचे सोन्याची पोत जबरी तोडून धुमस्टाईल लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सुषमा पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात देान भामट्यांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक के.के. पाटील करीत आहे.