यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथिल विविध शाळांचा दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून या सर्व शाळांमधील मुलीने उत्तुंग भरारी घेतली आहे.
यावल बाल संस्कार माध्यमिक विद्यालयाचा दहावी परीक्षेतील विद्यालयाचा दहावीचा मार्च 2022 चा निकाल 98 .71 टक्के लागला असुन. या विद्यालयातून एकुण 78 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झालेले होते. त्यापैकी 77 विद्यार्थी हे दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झाले. एक विद्यार्थी हा गैरहजर असल्यामुळे नापास झाला आहे.
एसएससीच्या २०२२च्या ऑनलाईन परिक्षेत प्रथम – तन्वी मंदार गडे 98 % तर द्वितीय – सुप्रिया प्रशांत श्रावगी 95.40 %तृतीय – सायली ईश्वर बारी 94.40 % हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष महेश वाणी, संचालक मंडळ, मुख्याध्यापक अतुल गर्गे उपशिक्षक ललित चौधरी, नितीन बारी, सुनील देशमुख तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. नगर परिषद व्वारे संचलीत साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा देखील निकाल जाहीर झाला.
विज्ञान शाखेचा निकाल १०० % टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल देखील १०० % टक्के तर कला शाखेचा निकाल ८८ % टक्के लागला. यात विज्ञान शाखेतुन प्रथम आलेले विद्यार्थी कल्पेश मोहन सोनार, ९० , 33, व्दीतीय क्रमांकाने श्रीराज सुरेश महाजन, तृत्तीय कृमांकाने ८८ .६७ टक्के गुणांसह मनिष पाटील, वाणिज्य शाखेतुन प्रथम करुणा साळवे ८१.१७ टक्के गुण, व्दीतीय क्रमांकाने सायली भागवत ८० % टक्के मिळवुन उत्तीर्ण झाली असुन उर्मिला सावकारे हि ७८.१७ % टक्के गुणांसह तिसरी आली आहे.
कला शाखेतुन प्रेरणा गजरे ही ७७ % टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली असुन गौरी चौधरी ही ७५ टक्के गुणांसह दुसरी आली तर दीक्षा जोशी व विक्रम बारेला हे ७३.६७ % टक्के गुण मिळवुन तिसरी आली आहे. महाविद्यालयाच्या सर्व यशस्वी झालेल्या विद्यार्थीनी व विद्यार्थी यांचे मुख्याध्यापक एम. के. पाटील व सर्व शिक्षकांनी केले आहे.