Home Cities धरणगाव अहिरे बुद्रुक येथील विकासोच्या चेअरमनपदी शरद पाटील बिनविरोध

अहिरे बुद्रुक येथील विकासोच्या चेअरमनपदी शरद पाटील बिनविरोध

0
39

धरणगाव, प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शरद पंढरीनाथ पाटील यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. निवड झाल्यानंतर समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. विजयी झालेल्या उमेदवारांमधून चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडीसाठी आज शुक्रवार १७ जुन रोजी सकाळी विविध कार्यकारी सोसायटी येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत चेअरमनपदी शरद पंढरीनाथ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी गोकूळ पाटील यांची निवड बिनविरोध करण्यात आली. याप्रसंगी निर्मलाबाई पाटील, विमलबाई पाटील, गणेश पाटील, छगन पाटील , कैलास पाटील, रवींद्र पाटील, मुरलीधर पाटील, चुडामन पाटील, पोपट पाटील, अंकुश सोनवणे, नाना बळीराम पाटील, संदीप पाटील, रामलाल पाटील, देविदास पाटील सचिव भानुदास पाटील हे उपस्थित होते.


Protected Content

Play sound